सोशल मीडियावर प्रभावी मार्केटिंग करायचं असेल तर लाईक मोजत बसू नका, रिझल्ट मिळवायला शिका!

सोशल मीडियावर प्रभावी मार्केटिंग करायचं असेल तर लाईक मोजत बसू नका, रिझल्ट मिळवायला शिका!

सोशल मीडियावर दररोज हजारो लोक काहीतरी पोस्ट करत असतात. काहीजण मोटिवेशनल कोट्स किंवा ऑफर्स पण शेवटी विचार करायला हवा “या सगळ्यातून खरंच किती ग्राहक मिळाले?” कारण यश हे लाईक आणि व्हिवुज वर नाही, तर खऱ्या उत्पन्न च्या ट्रांजेक्शन वर मोजलं जातं.
आपण ज्या व्यावसायिक जगात काम करतो, तिथं प्रसिद्धीपेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे. आणि म्हणूनच, सोशल मीडियावर व्यवसाय करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा
मार्केटिंग तेव्हाच योग्य आहे, जेव्हा ते विक्री आणून देते करते
सोशल मीडिया हे एखाद्या कार्यक्रमा सारखं आहे लोक येतात, बघतात, आणि शुभेच्छा देतात आणि पुढे निघून जातात. पण खरं काम त्या गर्दीतून आपला खरा कस्टमर ओळखणं आणि त्याला आपल्याकडे वळवणं हे असतं!

त्यासाठी सोशल मीडिया वर खालील गोष्टी आवश्यक आहे:

  • Niche – सगळ्यांना Target करणं म्हणजे कुणालाच Attract न करणं.
  •  Lead Magnet – अशी काहीतरी ऑफर जी Prospects ना लगेच आकर्षित करते.
  •  Call-to-Action – “Buy Now”, “Join Free Demo”, “Click Here” — ठळक, सोपी आणि तातडीची.
  •  Funnel Thinking – नवीन अनोळखी व्यक्ती एका क्लिकवर ग्राहक होत नाही; त्याला योग्य मार्गदर्शन हवं असतं.

जेव्हा एखादा माणूस आपल्या वेब साईट वर येतो, तेव्हा तो फक्त एक व्हीवर नसतो तो आपल्या पुढच्या विक्रीचा संभाव्य ग्राहक असतो. त्याला “Micro-Commitments” मधून पुढे आणा —
1) एखादी पोस्ट share करायला लावा,
२) एखादा फॉर्म भरायला लावा,
३) एखादा मेल वाचायला लावा.
Email अजूनही सगळ्यात Result देणारं माध्यम आहे. तुम्ही त्याचबरोबर WhatsApp, DM, Offline Letter, किंवा Phone Call वापरून संबंध मजबूत करू शकता.

सर्वात महत्त्वाचं— Test करा!
कुठली Headline चांगली काम करते? कुठल्या Creative ला जास्त clicks मिळतात? कुठल्या वाक्याने ग्राहकांनी फोन उचलला?

Social media वर फक्त पोस्ट्स करणं म्हणजे Marketing नाही. Marketing म्हणजे माणसांना तुमच्याशी जोडणं आणि त्यांच्याकडून खरेदी घडवून आणणं.*
तर आज Instagram, Facebook, YouTube किंवा WhatsApp वर काही पोस्ट कराल, तेव्हा स्वतःला विचारा —
“यातून मला व्यवसायात काय मिळणार आहे?”
कारण शेवटी बिझनेस म्हणजे फेम प्रसिद्धी नव्हे, प्रॉफिट असतो! आणि प्रॉफिट मिळवण्यासाठी डायरेक्ट रिस्पॉन्स हा एकमेव मार्ग आहे जो स्पष्ट, प्रभावी, आणि मोजता येणारा असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *